ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा येथे रक्तदान शिबिर संपन्न.

बांदा येथे रक्तदान शिबिर संपन्न.

प्रकाशन: 29 Dec 2024 09:06 PM
वाचन संख्या 73

दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी शाखा यांचे आयोजन.

बांदा | प्रतिनिधी : दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २५ दात्यांनी रक्तदान केले. गोवा बांबोळी मेडिकल रुग्णालयच्या रक्तपेढीने रक्त संकलन केले. रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने कमी वेळेत हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. २५ दात्यांनी यावेळी रक्तदान केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष शैलेश लाड, सिंधु रक्तमित्रचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, तालुका अध्यक्ष सुनील राऊळ, रक्तदाते सुधीर पराडकर, तालुका कार्यकारिणी सदस्य अक्षय मयेकर, युनिक फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश मोरजकर, प्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, शिक्षक जे. डी. पाटील, लाड मित्रमंडळाचे सचिव संदीप नार्वेकर, कर सल्लागार समीर परब, राकेश परब, प्रशांत गवस आदिसह रक्तदाते व ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स