कसालच्या तन्वी कदमचे चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यश.
मसुरे | प्रतिनिधी : कसाल येथील उद्योजक संतोष कदम आणि डॉ. श्रेया कदम यांची कन्या तन्वी हिने चार्टर्ड अकाऊंटंट या परीक्षेत यश मिळविले. हा निकाल देशपातळीवर असतो. तन्वी एकाच वेळी दोन गृप घेवून या परीक्षेस बसली होती आणि ती चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाली.
तन्वी कदम ही डॉन बॉस्को हायस्कूल ओरोसची विद्यार्थिनी होती. दहावीच्या परीक्षेत तीने १००% गुण मिळविले होते. तसेच मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजमध्ये बारावी परीक्षेत ति ९२% गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती तसेच ती बी. कॉम. परीक्षेतही टॉपर होती. सातत्याने शैक्षणिक वाटचालीत तिने यापूर्वी खेळ, सांस्कृतिक विभाग आणि अभ्यास या क्षेत्रात तिने यश मिळविले होते. आई वडिल आणि गुरूवर्यांना तिने यशाचे श्रेय दिले आहे. तिच्या या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून आणि कदम परिवार यांच्या मित्रपरिवारातून तिचे अभिनंदन केले आहे तसेच खासदार नारायण राणे आणि सौ निलम राणे यांनी फोन करून अभिनंदन केल्याची माहिती संतोष कदम यांनी दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)