ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे मुंबई विद्यापीठ अंतर्गत स्पर्धेत सुवर्णपदकीय यश.

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे मुंबई विद्यापीठ अंतर्गत स्पर्धेत सुवर्णपदकीय यश.

प्रकाशन: 10 Dec 2024 01:38 AM
वाचन संख्या 130

पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत विज्ञान शाखेच्या हर्ष सावंत याने एकूण ६१३ किलो वजन उचलत पटकावले सुवर्णपदक.

वैभववाडी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठ अंतर्गत पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकीय कामगिरी केली. या महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्ष अभिजीत सावंत याने पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. ०८ डिसेंबर २०२४ रोजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोवेली (ता. कल्याण ) येथे मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धा संपन्न झाल्या. महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणार्या विज्ञान शाखेतील विद्यार्थी हर्ष सावंत हा १०५ ते १२० किलो वजनी गटातून सहभागी झाला होता, या गटामध्ये त्याने एकूण ६१३ किलो वजन उचलून या गटातून सुवर्णपदक प्राप्त केले. हर्ष सावंतचे संस्थापदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स