ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ओसरगांव शाळा नंबर १ येथे संविधान दिन उत्साहात.

ओसरगांव शाळा नंबर १ येथे संविधान दिन उत्साहात.

प्रकाशन: 28 Nov 2024 08:28 PM
वाचन संख्या 91

विस्तार अधिकारी श्रीमती मांजरेकर, मुख्याध्यापक किशोर कदम यांच्यासह शिक्षक विद्यार्थ्यांचा सहभाग.

मसुरे | प्रतिनिधी : ओसरगाव जि. प. शाळा नंबर १ येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमातून आयोजित करण्यात आला. यावेळी संविधान रॅली काढण्यात आली.
‘हर घर संविधान” या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मांजरेकर, मुख्याध्यापक किशोर कदम, पदवीधर शिक्षिका शितल दळवी, राजश्री तांबे, प्रमिता तांबे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते .

यावेळी शाळा ओसरगाव नं.१ तर्फे संविधान जागृती रॅली काढण्यात आली. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना विस्तार अधिकारी श्रीमती मांजरेकर म्हणाल्या,भारतीय राज्यघटना मानव मुक्तीचा खरा जाहीरनामा आहे कारण यामध्ये स्वतंत्र भारतातील जात, धर्म, लिंग, भाषा, प्रदेश इत्यादीची विषमता लक्षात घेऊन सर्व घटकांना न्याय देण्याचे काम भारतीय राज्यघटनेने केले आहे.

किशोर कदम म्हणाले, स्वतंत्र भारताची सार्वभौम जगप्रसिद्ध असे राज्यघटना लिहून त्या घटनेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार ठरलेआहेत. घटनेने आपणास सर्व प्रकारची ताकद दिली आहे या घटनेच्या आधारे भारत देश कसा चालला जातो, याचे दर्शन घडते आणि म्हणून संपूर्ण देशाचा विकास करून आणणारी देशातील माणसांना माणुसकीचे मान सन्मानाचे आणि नैतिकतेचे दर्शन घडविणारी राज्यघटना संपूर्ण जगाला आदर्श ठरणारे आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमिता तांबे यांनी तर आभार शितल दळवी यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स