ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रेल्वे खाली येत शिरगांव येथील तरुणाची आत्महत्या.

रेल्वे खाली येत शिरगांव येथील तरुणाची आत्महत्या.

प्रकाशन: 22 Nov 2024 06:34 PM
वाचन संख्या 270

कणकवली| ब्यूरो न्यूज : कणकवली शहरानजीक नागवे हद्दीत असलेल्या रेल्वे रुळावर दुपारी १२:३० वाजता (१०१०४) मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस ही नागवे हद्दीत रेल्वे रुळावर आल्यावर निशिकांत भास्कर जाधव (वय ३९, रा. शिरगाव बौद्धवाडी) हे रेल्वे रुळाच्या बाजूला बसलेल्या स्थितीत मांडवी एक्सप्रेस च्या लोको पायलटला दिसले. रेल्वे जशी जवळ आली तशी निशिकांत भास्कर जाधव यांनी रुळावर झोकून दिले असल्याची माहिती मांडवी एक्सप्रेस चे लोकोपायलट यांनी दिली असल्याची माहिती रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल एच. पी. शिंदे यांनी दिली. अपघातानंतर मांडवी एक्सप्रेस तब्बल १२ मिनिटे घटनास्थळाच्या पुढे थांबली होती, असेही श्री. शिंदे म्हणाले.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल एच. पी. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश सावंत, पोलीस हवालदार विनोद सुपल, होमगार्ड अनिकेत राणे, महेश पाटील, घटनास्थळी दाखल झाले. निशिकांत जाधव यांचा मृतदेह नागवे येथील रेल्वे रुळावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या डाव्या बाजूला पडला होता. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून झाल्यावर कणकवली उप जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. घटनेचा पुढील तपास सुरु असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स