ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅन्केला आंतरराष्ट्रीय पुरस्कार.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅन्केला आंतरराष्ट्रीय पुरस्कार.

प्रकाशन: 22 Nov 2024 07:34 PM
वाचन संख्या 268

ब्यूरो न्यूज : बॅन्किंग सिस्टीम इंटेलिजन्स या जागतिक पातळीवर बँकिंग क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थेमार्फत दिला जाणारा ‘ग्लोबल फाईनटेक पर्स्पक्टीव्ह’ अंतर्गत बँकींग क्षेत्रात मानाचा समजला जाणारा सर्वोत्कृष्ट कोर बँकिंग सिस्टीम ( इंप्लिमेंटेशन) हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जाहीर झाला आहे.

आज ताज हाॅटेल, मुंबई येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात इन्फोसिसचे संचालक बॉबी पारेख यांच्या हस्ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना हा पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा बँकेच्या संगणक विभागाचे सरव्यवस्थापक नितीन सावंत, व्यवस्थापक रघुनाथ परब उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स