ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
संत रविदास भवन  माध्यमातून चर्मकार समाजात एकोपा निर्माण करायचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांचे कणकवली येथील चर्मकार समाज सभेत आवाहन...!

संत रविदास भवन माध्यमातून चर्मकार समाजात एकोपा निर्माण करायचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांचे कणकवली येथील चर्मकार समाज सभेत आवाहन...!

प्रकाशन: 24 Oct 2021 03:37 PM
वाचन संख्या 47

पोईप | ओंकार चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित संत रविदास भवन भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कणकवली तालुका शाखेच्या सभेत जिल्हा मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी उपस्थित समाजबांधवांना आवाहन करताना सांगितले की,समाज भवन निर्मिती करत असताना समाजाचा एकोपा निर्माण करूया.भवनाच्या माध्यमातून एक सामाजिक प्रतीक उभारूया असे आवाहन केले. 31 ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहून भवनासाठी आपले योगदान देऊया असे सांगितले.भवन समितीचे सहप्रमुख सुधीर जाधव यांनी भवन बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वानी एकजुटीने प्रयत्नशील राहूया असे आवाहन केले.जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी भवन कामाच्या संदर्भात सर्व माहिती सभेत दिली.तसेच भवन साठी सर्वानी खारीचा वाटा उचलूया असे आवाहन केले.यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण,ज्येष्ठ सल्लागार लवू पवार,चंद्रकांत भोसले,जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव,जिल्हा सहसचिव अनिल चव्हाण,समिती कार्यवाह लवेंद्र किंजवडेकर,समिती प्रमुख महेंद्र चव्हाण, पंढरीनाथ जाधव,विनायक जाधव,प्रभाकर चव्हाण,अनिल जाधव,विनायक चं.जाधव,सचिन चव्हाण,अमित भोसले,सुमित भोसले,प्रसिद्धिप्रमुख मंगेश आरेकर आदी उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सचिव अनंत जाधव यांनी केले.

   

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स