ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आकेरी गावातील युवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल.

आकेरी गावातील युवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल.

प्रकाशन: 11 Nov 2024 12:59 PM
वाचन संख्या 34

शेतकऱ्यांच्या वेळेप्रसंगाला धावुन येणारे आमदार म्हणून वैभव नाईकच हवे ; प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया.

युवकांमध्ये आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाची भुरळ.

प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील आकेरी गावातील युवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सर्व युवकांचे शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.

यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले आमदार वैभव नाईक हे सर्व सामान्य जनतेमध्ये वावरुन सर्वसामान्यांच्या वेळप्रसंगाला धावुन जाणारे आमदार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आ.वैभव नाईक सातत्याने करतात.एक हक्काचे आमदार म्हणून आम्हाला त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असून त्याच विश्वासातून आम्ही ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे प्रवेशकर्ते यांनी यावेळी
सांगितले.

यावेळी विशाल परब, मनोज माणगावकर,निकिता राणे,प्रतिक राणे,संध्या माणगावकर,अनिकेत सावंत, जयदीप सावंत, हेमंत मेस्त्री,ताता पालव,महेश धुरी, ऋषिकेश धुरी,कृष्णा आकेरकर, सचिन आकेरकर, प्रथमेश आकेरकर,गौरव नाईक,तृप्ती आईर,मनोज सावंत या युवकांनी व युवतींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

याप्रसंगी माजी जि. सदस्य रमाकांत ताम्हणेकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, विभागप्रमुख बंड्या कुडतरकर,आकेरी सरपंच महेश जामदार, उपसरपंच गुरुनाथ पेडणेकर, विभाग संघटक कौशल जोशी, ग्रा.प. सदस्य प्रमोद घोगळे, सुर्या घाडी, शाखाप्रमुख उमेशकुमार परब, शाखाप्रमुख बाळा राणे, उपशाखाप्रमुख अभय राणे,महादेव परब, रुपेश वारंग,गिरीश सावंत,सूर्यकांत जाधव, संतोष गावडे, सचिन पालव, रुपाली पेडणेकर,राजेश मेस्त्री, सिद्धेश परब, निलेश केसरकर,सुहास सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स