डिकवल येथे शेपटी रोगाने (बोटूलिझम) गुरांचा मृत्यू.
पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील गोळलण डिकवल येथे गेल्या आठ दिवसात शेपटी रोग (बोटूलिझम) या आजाराने गुरांचा मृत्यू झाला आहे. गुरे दगावल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डिकवल तेलीवाडी येथील शेतकरी सुभाष पांडुरंग तेली यांची सुमारे एक लाख रुपये किमतीची गुरे शेपटी रोगाने दगावली. गेल्या आठ दिवसांत या परिसरात शेपटी रोग (बोटूलिझम) या आजाराने येथील गुरांना प्रादुर्भाव झाला आहे. या आजाराने गुरे निष्क्रिय होऊन गुरांची प्रतिकारशक्ती कमी होते. परिणामी आठ दिवसांत कोणत्याही गावठी व वैद्यकीय उपचाराला गुरे प्रतिसाद देत नसल्याने गुरे मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे शासनाकडून संबंधित क्षेत्राचा सर्व्हे करून गुरांना लसीकरण करावे, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. तसेच मृत गुरांच्या मालकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत.
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्र...
१४ ते २५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात लेझर लाईट व बीम्स उपकरणांच्या वापरास मनाई.
देवगडच्या मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्ष GNM विद्यार्थ्यांचा ‘लॅम्प लायटिंग व शपथविधी’ सोहळा उत्साहात.