मालवणात ९ नोव्हेंबर रोजी मतदान जनजागृतीपर बाईक रॅली.
मालवण | प्रतिनिधी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मालवण शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने मतदारांमध्ये जनजागृती साठी शनिवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सागरी महामार्ग देऊळवाडा (कवटकर हॉटेल) या ठिकाणी मतदान जनजागृतीपर बाईक रॅलीचे आयोजन करणेत आले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदार जनजागृती बाईक रॅलीसाठी उपस्थितीचे आवाहन नगरपरीषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)