ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
न्हावेलीतील आकाशकंदील, रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा निकाल जाहीर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

न्हावेलीतील आकाशकंदील, रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा निकाल जाहीर.

प्रकाशन: 04 Nov 2024 07:16 PM
वाचन संख्या 64

मळगांव | नितिन गावडे : दिवाळी पाडव्यानिमित्त न्हावेलीतील चौकेकरवाडी येथे पार पडलेल्या आकाशकंदील व रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आकाशकंदील स्पर्धेत मळेवाड येथील कु. सुचिता सचिन कारीवडेकर चा प्रथम क्रमांक, अणसुर येथील श्री. प्रमोद विश्राम गावडे द्वितीय क्रमांक, तर सौ. प्रेरणा प्रमोद गावडे यांचा तृतीय क्रमांक आला आहे. रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटात तुळस येथील कु.दिशम परब याचा प्रथम क्रमांक , तर सावंतवाडी येथील कु. सोहम जांभोरे द्वितीय क्रमांक व अणसुर येथील अभंग रगजी याचा तृतीय क्रमांक आला. तर मोठ्या गटातून वेंगुर्ले येथील जयेश सोनुर्लेकर याचा प्रथम क्रमांक तर नंदीनी बिले हिचा द्वितीय तर इन्सुली येथील नेहा जाधव हिचा तृतीय क्रमांक मिळाला.

रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी गौरी बांदेकर, पंकज तिळवे यांनी काम पाहिले तर आकाशकंदील स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दिगंबर मोरये यांनी काम पाहिले. स्पर्धेचे सूत्रसंचलन आदीत्य निर्गुण व वामन राऊळ यांनी केले.

यावेळी बक्षीस वितरण समारंभाला न्हावेली गावचे सरपंच अष्टविनायक धाऊसकर, त्रिबंक आजगांवकर, आकाश निर्गुण, नारायण नाईक, वैभव चौकेकर, गोविंद मोर्ये, रोहित निर्गुण वामन राऊळ अन्य पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स