आशुतोष मयेकर यांची मालवण उप युवा तालुकाप्रमुख पदी नियुक्ती ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले नियुक्तीपत्र प्रदान.
मालवण | प्रतिनिधी : शिवसेना पक्षात प्रवेश केलेले बांदिवडे सरपंच आशुतोष मयेकर यांची शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण युवा उप तालुकाप्रमुख पदी नियुक्ती केली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते आशुतोष मयेकर यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मालवण तालुकाप्रमुख महेश राणे, युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख मंदार लुडबे व आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर, महेश पेडणेकर, प्रफुल्ल प्रभू , आनंद परब, शकर आईर, भूषण परब, लीलाधर मुणगेकर, अमित कारेकर, सचिन पाटकर, शैलेश बेलवलकर, पिंकू मोरे, पेडणेकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)