ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
संत रविदास भवन भूमिपूजन कार्यक्रम उत्साह व दिमाखात होणार संपन्न...!

संत रविदास भवन भूमिपूजन कार्यक्रम उत्साह व दिमाखात होणार संपन्न...!

प्रकाशन: 23 Oct 2021 10:05 PM
वाचन संख्या 49

जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व जिल्हासरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी दिली सभांची तपशीलवार माहिती…

कणकवली | उमेश परब : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित नियोजित संत रविदास भवन भूमिपूजन सोहळा रविवार दि. ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजी हुमरमळा, ता. कुडाळ येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा मंडळाने तालुकावार सभा नियोजनाचे आवाहन तालुका शाखांना केले होते. यानुसार तालुकानिहाय सभांचे आयोजन करण्यात आले असून सदर सभांना जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. संत रविदास भवन निर्मितीचे चर्मकार समाजाचे स्वप्न असून सदर स्वप्नपूर्ती होत असल्याने समाजबांधवांमध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण आहे.तालुकावार सभांचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे. कुडाळ शाखा- शनिवार दि. २३ रोजी सकाळी १० वाजता, लिंगेश्वर प्रिंटर्स कुडाळ येथे मार्गदर्शक म्हणून ऍड. अनिल निरवडेकर (प्रमुख मार्गदर्शक), सुरेश पवार (जिल्हा उपाध्यक्ष), उदय शिरोडकर (भवन समिती कार्यवाह), सावंतवाडी शाखा- शनिवार दि. २३ रोजी सायंकाळी ४ वाजता, सावंतवाडी डॉ. आंबेडकर समाजभवन येथे, मार्गदर्शक म्हणून ऍड. अनिल निरवडेकर (प्रमुख मार्गदर्शक), लवू चव्हाण (जिल्हा उपाध्यक्ष), कणकवली शाखा रविवार दि. २४ रोजी सकाळी १० वाजता चंद्रकांत भोसले निवासस्थानी कणकवली येथे मार्गदर्शक श्री. सुजित जाधव (जिल्हाध्यक्ष), श्री. चंद्रसेन पाताडे (जिल्हा सरचिटणीस), सुधीर जाधव (भवन समिती सहप्रमुख), देवगड शाखा- रविवार दि. २४ रोजी दुपारी १२ वाजता प्रशांत मिठबांवकर यांचे निवासस्थानी मिठबांव येथे मार्गदर्शक सुजित जाधव (जिल्हाध्यक्ष), चंद्रसेन पाताडे(जिल्हा सरचिटणीस), नामदेव जाधव (जिल्हा कोषाध्यक्ष), मालवण शाखा-रविवार दि. २४ रोजी दुपारी ३ वाजता भवानी मंदिर नांदोस चव्हाणवाडी येथे मार्गदर्शक सुजित जाधव (जिल्हाध्यक्ष), चंद्रसेन पाताडे (जिल्हा सरचिटणीस), श्रीराम चव्हाण (भवन समिती प्रमुख), वेंगुर्ला शाखा- रविवार दि. २४ रोजी सायंकाळी ४ वाजता साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे मार्गदर्शक म्हणून ऍड. अनिल निरवडेकर (प्रमुख मार्गदर्शक), उदय शिरोडकर (भवन समिती कार्यवाह) अशाप्रकारे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व जिल्हासरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स