ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आडवलीच्या ॠतुजा सुरेश मेस्त्रीचे सर्जनशील लेखन स्पर्धेत सुयश..!

आडवलीच्या ॠतुजा सुरेश मेस्त्रीचे सर्जनशील लेखन स्पर्धेत सुयश..!

प्रकाशन: 23 Oct 2021 10:26 PM
वाचन संख्या 96

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,सिंधुदुर्ग यांच्यातर्फे आयोजित केली गेलेली स्पर्धा.

चिंदर | विवेक परब :गुरू तेग बहादुरजी यांच्या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्जनशील लेखनाच्या दृष्टीने ” जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,सिंधुदुर्ग यांच्या वतीने गुरुवार.दि.२३/०९/२०२१ रोजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
प्रशालेतून या स्पर्धेसाठी सहा विध्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.या निबंध लेखन स्पर्धेतून मालवण तालुक्यातील, सर्वोदय एज्युकेशन सोसायटी,मुंबई संचलित आर ए यादव  हायस्कूल  प्रशालेतील कुमारी ऋतुजा सुरेश मेस्त्री (इ.७वी) या विद्यार्थीनीची मालवण तालुक्यामध्ये तृतीय क्रमांकाने निवड झालेली आहे. तसेच जिल्हा स्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे.
या यशाबद्दल तिच्या प्रशालेत अत्यंत उत्साहाचे वातावरण असून या यशाबद्दल तिचे व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक सर्व शिक्षकांचे सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई अध्यक्ष,सदस्य,पदाधिकारी, शाळा समिती अध्यक्ष,सदस्य,निमंत्रित सदस्य, मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तर्फे हार्दिक-हार्दिक अभिनंदन केले आहे.
प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी कु.ॠतुजा सुरेश मेस्त्री हिचे विशेष अभिनंदन करुन तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स