ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
प्रीतम गावडे यांची शिवसेना युवासेना कुडाळ - मालवण विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती.

प्रीतम गावडे यांची शिवसेना युवासेना कुडाळ - मालवण विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती.

प्रकाशन: 24 Oct 2024 09:16 AM
वाचन संख्या 131

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण येथील युवा नेतृत्व प्रितम गावडे यांची शिवसेना युवासेना कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना महाराष्ट्र सचिव किरण साळी यांनी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र प्रितम गावडे यांना सावंतवाडी येथील युवासेना कार्यक्रमांत सुपूर्द केले.

दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या ‘युवासेना विधानसभा अध्यक्ष’ (कुडाळ – मालवण) पदी नियुक्ती करण्यात येत आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. आपल्या सामाजिक व राजकिय क्षेत्रातील भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. असे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग माजी सचिव किसन मांजरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवतीसेना सोनाली पाटकर, कणकवली विभाग जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स