शिवसेना नेते निलेश राणे विजयी होणार यात तीळमात्र शंका नाही.
शिवसेना आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी नेते निलेश राणे यांचे शिवसेनाआचरा विभागाच्या वतीने केले सहर्ष स्वागत.
मालवण | प्रतिनिधी : माजी खासदार व नेते निलेश राणे यांचा शिवसेना पक्षप्रवेश झाल्यानंतर आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी त्यांचे आचरा विभाग तथा आचरा जिल्हा परीषद मतदार संघाच्या वतीने स्वागत केले आहे. निलेश राणे साहेबांच्या प्रवेशाचे आचरा मतदार संघाच्या वतीने विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीत आचरा जिल्हा परिषद मतदार संघाचे सर्वाधीक जास्त लीड असेल यात कोणतीही तीळमात्र शंका नाही असा विश्वास त्यांनी दर्शविला आहे. सूज्ञ मतदार तसेच महिला व युवा मतदार हे राणे साहेबांच्या पाठिशी खंबिर पणे उभे राहणार असून त्यांना मोठ्या मताधिक्य देण्यात आचरा जिल्हा परीषद मतदार संघ प्रथम क्रमांकावर असेल असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर म्हणाले की विरोधक विरोधक हे सध्या शासनाच्या अनेक योजना किंवा लाडकी बहिण योजना याचा अपप्रचार करून मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. विरोधक विकासाच्या मुद्यावर न बोलता मतदारांचे मन वळवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर टिका करताना दिसत आहेत . त्याचा शिवसेना नेते निलेश राणे यांच्या विजयावर कोणताही परिणाम जि. प. आचरा मतदार सघांतून नक्कीच होणार नाही याची सर्व जबाबदारी प्रत्येक सूज्ञ मतदार घेतील व हक्काच्या शिवसेनेच्या कुडाळ मालवण मतदार संघावर राणे साहेबांच्या रूपाने धनुष्यबाण निशाणीचा भगवा फडकेल असा विश्वास पळसंबचे माजी सरपंच व शिवसेना आचरा विभाग प्रमुख श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना आचरा विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते निलेश राणे यांच्या विजयासाठी अत्यंत उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)