ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
को. म. सा. प. कणकवली शाखेच्या नूतन कार्यकारी मंडळाची निवड.

को. म. सा. प. कणकवली शाखेच्या नूतन कार्यकारी मंडळाची निवड.

प्रकाशन: 21 Oct 2024 07:19 AM
वाचन संख्या 108

कणकवली | प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कणकवली शाखेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, लेखक माधव कदम यांची तर कार्यवाहपदी सिध्देश खटावकर यांची निवड करण्यात आली कोमसाप चे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा समन्वयक रूजारिओ पिंटो तसेच सुरेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील हाॅटेल अप्पर डेक च्या सभागृहात आयोजित सभेमध्ये जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी कणकवली शाखेच्या नूतन कार्यकारिणी मंडळाची निवड सर्वानूमते करून घोषित केली. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, जेष्ठ साहित्यिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या सूचनेनुसार कणकवली येथील साहित्यिक, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची सभा झाली. कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके अध्यक्षस्थानी होते. या सभेमध्ये श्री . मसके यांनी सर्वानुमते कणकवली शाखेच्या नूतन कार्यकारी मंडळाची निवड केली ती खालीलप्रमाणे आहे.

तालुका शाखाध्यक्ष माधव कदम, जिल्हा प्रतिनिधी संदिप वालावलकर, उपाध्यक्ष राजस रेगे, खजिनदार डॉ. सतीश कामत, कार्यवाह सिध्देश खटावकर, कार्यकारी मंडळ सदस्य गणेश जेठे, महेश काणेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, अशोक करंबेळकर, सौ. निकिता ठाकूर, चिराग बांदेकर, अमर पवार, तर कार्यक्रम समिती सदस्य पदी सौ. रिमा भोसले, अभय खडपकर, धाकू तानावडे, निलेश ठाकूर, लक्ष्मण नारकर, सौ. गितांजली कुलकर्णी. कणकवली शाखेच्या नूतन कार्यकारी मंडळाचे कोमसाप चे संस्थापक मधू मंगेश कर्णिक आणि मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदिप ढवळ यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स