ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिक्षिका रश्मी रामचंद्र आंगणे यांना  शिक्षणतज्ञ जी. टी. गांवकर शिक्षण सेवामयी पुरस्कार जाहीर..

शिक्षिका रश्मी रामचंद्र आंगणे यांना शिक्षणतज्ञ जी. टी. गांवकर शिक्षण सेवामयी पुरस्कार जाहीर..

प्रकाशन: 23 Oct 2021 12:17 PM
वाचन संख्या 56

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेतर्फे पुरस्कार जाहीर ..

आचरा | विवेक परब :  अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा थोर शिक्षणतज्ञ जी. टी. गावकर सेवामयी शिक्षण पुरस्कार देवगड तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा, चाफेड भोगलेवाडी शाळेच्या शिक्षिका श्रीम. रश्मी रामचंद्र आंगणे यांना जाहीर झाला असून त्याचे वितरण ९ जानेवारी २०२२ रोजी चाफेड भोगलेवाडी शाळेच्या प्रांगणात मा. प्रजापती थोरात (गटशिक्षणाधिकारी पं.स. देवगड) आणि सन्माननीय साने गुरुजी कथामाला कार्यकारीणी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फार मानाचा मानला जाणारा हा पुरस्कार थोर शिक्षणतज्ञ आदरणीय जी. टी. गावकर यांचे स्मृतिप्रित्यर्थ प्रदान करण्यात येतो. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र, महावस्त्र अश्या प्रकारे पुरस्काराचे स्वरुप असून दरवर्षी निवड समितीमार्फत शिक्षकांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, क्रिडाविषयक आदी अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करुन सदर पुरस्कारासाठी निवड होते. त्यात शिक्षकांचे कथामालेचे कार्य आणि बही:शाल शिक्षणाचे कार्य यांचे मूल्यमापन समिती मार्फत केले जाते.
सदर पुरस्कार निवड समितीचे प्रमुख सदानंद मनोहर कांबळी यांनी काल याबाबतची अधिकृत घोषणा केली.
श्रीम. रश्मी रामचंद्र आंगणे यांनी गेले पाव शतक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सेवा बजावित असताना विविध शैक्षणिक उपक्रमांतून शाळा घराघरांत कशी जाईल आणि मुलांचे घर शाळेत कसे येईल याबाबत विविध शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शाळेत सेवा बजावित असताना वंचित घटकांसाठी तसेच शिष्यवृत्ती, क्रीडा, साहित्य, संस्कृती आदीबाबत बालकांना व पालकांना मार्गदर्शन केले आहे.
अ. भा. साने गुरुजी कथामाला मासिकाने त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना आपल्या मुखपृष्ठावर स्थान दिले आहे.
अ. भा. साने गुरुजी कथामाला मालवण तालुकाध्यक्ष सुरेश श्यामराव ठाकूर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, शिक्षणतज्ञ जी. टी. गावकर यांच्या नावाचा पुरस्कार रश्मी रामचंद्र आंगणे ह्या ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या शिक्षिकेला मिळणे ही रश्मी आंगणे यांच्या पाव शतकाच्या निरलस शैक्षणिक सेवेची पोचपावती आहे.”*
रश्मी रामचंद्र आंगणे यांचे ह्या सेवामयी शिक्षण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व थरांतून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स