ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ऍड संग्राम देसाई यांची महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिल अध्यक्षपदी निवड.

ऍड संग्राम देसाई यांची महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिल अध्यक्षपदी निवड.

प्रकाशन: 03 Oct 2024 09:03 AM
वाचन संख्या 66

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केले ऍड संग्राम देसाई यांचे अभिनंदन.

मुंबई | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व कुडाळ येथील ऍड संग्राम देसाई यांची महाराष्ट्र – गोवा बार कौन्सिल अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निमित्ताने, ६ ऑक्टोबर रोजी कुडाळ शहरातील लक्ष्मी हाॅल येथे त्यांचा विविध सामाजिक व राजकीय संस्थांच्यावतीने नागरी सत्कार देखील संपन्न होत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याले हा बहुमान प्रथमच मिळालेला असल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी मुंबई येथून, ऍड संग्राम देसाई यांचे एका प्रसिद्धी संदेशाद्वारे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या आहेत.

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी त्यांच्या अभिनंदन संदेशात म्हणले आहे की ऍड संग्राम देसाई यांची २८ वर्षांची धडाडीची कारकिर्द ही कोकणसाठी एक आदर्श आहे. या दरम्यान त्यांनी विविध केसेसमधून न्यायदेवतेची केलेली सेवा ही उल्लेखनीय आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा व समस्त कोकणवासियांसाठी ते एक भूषणावह काम करत आहेत आणि भविष्यात देखिल सक्षमपणे करत राहतील.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स