ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मळगांव येथील महाआरोग्य शिबीरात १५० रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार.

मळगांव येथील महाआरोग्य शिबीरात १५० रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार.

प्रकाशन: 01 Oct 2024 09:23 PM
वाचन संख्या 178

मळगांव | नितिन गावडे : भारतीय जनता पार्टी मळगांव व
एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने मळगांव येथील पेडणेकर सभागृह येथे आयोजित महाआरोग्य शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे १५० हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी तसेच मोफत औषधांचे वाटप यावेळी करण्यात आले.

या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, माजी सरपंच स्नेहल जामदार, भाजप शक्ती केंद्रप्रमुख निळकंठ बुगडे, एस एस पी एम रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश घोगळे, डॉ. योगेश केंद्रे, डॉ. संजय जोशी, डॉ. निलेश म्हेत्रे, लॅब असिस्टंट अमित लिंगवत, भाजपचे बुथ अध्यक्ष भगवान रेडकर, एकनाथ गावडे, एकनाथ खडपकर, रुपेश सावंत, सुखदेव राऊळ, प्रा. गणपत शिरोडकर , निलेश राऊळ, ग्रामपंचायत सदस्य निकिता राऊळ, प्रकाश जाधव, अनिषा जाधव आदी उपस्थित होते.

या शिबिरामध्ये मोफत हृदयरोग तपासणी, कर्करोग तपासणी, नेफ्रोलॉजि तपासणी , दंतरोग तपासणी , नेत्ररोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी तसेच लघवी तपासणी ,
रक्त तपासणी , थायरॉईड तपासणी , शुगर तपासणी ‘ इसीजी
तसेच कर्करोग चाचणी करण्यात आली. दरम्यान, नेत्र तपासणी केलेल्या रुग्णांसाठी तसेच अन्य नेत्र तपासणी इच्छुक असलेल्या रुग्णांसाठी रविवार ६ ऑक्टोबर रोजी याच ठिकाणी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी नेत्र तपासणीनंतर अत्यल्प दरात चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे. सावंतवाडीतील शुभांगी ऑप्टिक्सच्या सौजन्याने या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी माजी सभापती राजू परब तसेच सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स