ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राजकोट पुतळा दुर्घटनेतील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेचा जामीन अर्ज फेटाळला.

राजकोट पुतळा दुर्घटनेतील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेचा जामीन अर्ज फेटाळला.

प्रकाशन: 01 Oct 2024 09:05 PM
वाचन संख्या 56

सिंधुदुर्गनगरी | ब्युरो न्यूज

मालवण शहरातल्या राजकोट येथील २६ ऑगस्ट रोजी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे यांनी आपल्याला जामीन मिळावा यासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला होता. यावर मंगळवारी सुनावणी होऊन हा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी नामंजूर केला. पुतळा उभारते वेळी ज्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक होते. त्या गोष्टींची काळजी घेतली गेली नाही. त्याचबरोबर या पुतळा उभारणीमध्ये वापरण्यात आलेले सर्व साहित्य हे निकृष्ट दर्जाचे होते असा युक्तिवाद सरकारी वकील यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य मानत न्यायालयाने जयदीप आपटे यांचा जामीन अर्ज नामंजूर केला. या कामी सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.

आपटे यांनी हे टेंडर दोन कोटी चार लाखाला घेतलेले होते. त्यांना संपूर्ण पैसे सुद्धा मिळालेले आहेत. परंतु पुतळा उभारताना जे साहित्य वापरले ते निकृष्ट दर्जाचे होते. तसेच बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे हा पुतळा कोसळला असे चौकशीत निष्पन्न झालेले आहे. यात त्यांचा सहभाग असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले गेले. त्यामुळे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. दरम्यान, न्यायालयाने या अगोदर या प्रकरणी चेतन पाटील याचा जामीन फेटाळलेला होता. आज आपटे याचा अर्ज सुद्धा फेटाळण्यात आला..

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 315

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स