ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रसाद गावडे.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रसाद गावडे.

प्रकाशन: 28 Sep 2024 09:02 PM
वाचन संख्या 111

कुडाळ | प्रतिनिधी : शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हाप्रमुख पदी श्री. प्रसाद गावडेंची नियुक्ती करण्यात आली आहे. कामगार चळवळीचा अनुभव, जिल्ह्यात शेतकरी तसेच कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांचे अभ्यासू कार्य व एका राजकीय पक्षाचा तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत शिवसेना वरीष्ठ नेते श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रीतम धारिया यांच्या शिफारशीने जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी प्रसाद गावडे नियुक्ती जाहीर केली आहे.

यावेळी जिल्हा संघटक रुपेश पावसकर, युवासेना कणकवली विधानसभा जिल्हा प्रमुख मेहुल धुमाळे, शिवसेना प्रवक्ते श्री.मंगेश गुरव, मनसेचे माजी ठेकेदार संघटना जिल्हाप्रमुख अमोल जंगले आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकरी व कामगार वर्गाची मोठी फळी संघटनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या भगव्या प्रवाहात जोडण्याचा मानस प्रसाद गावडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स