पळसंब तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी उल्हास सावंत यांची व उपाध्यक्षपदी महेश वरक....
सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांनी केले विशेष अभिनंदन
चिंदर | विवेक परब : पळसंब ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांच्या अध्यक्षतेच्या खाली पळसंब ग्रामपंचायत येथे सपन्न झाली. ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समिती नवीन स्थापन करण्यात आली,त्यावेळी समिती अध्यक्ष म्हणून श्री.उल्हास अनंत सावंत यांची निवड करण्यात आली व उपाध्यक्ष श्री.महेश वरक यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून प्रमोद सावंत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री.सुभाष तर्फे,श्री.सुरेश लाड,श्रीम.वंदना चिंचवलकर, श्री.सीताराम सकपाळ (पोलीस पाटील) यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली त्यावेळी ग्रामसेवक श्री काबंळी, उपसरपंच सुहास सावंत, सदस्य एकनाथ चिंचवलकर, अरुण माने, उज्वला परब, सिमा चव्हाण, रोशन चिचंलकर, राजन पुजारे हे उपस्थित होते. त्यावेळी सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिले.
( फोटोत डाविकडे श्री.उल्हास सावंत व उजवीकडे श्री.महेश वरक)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)