बांधकाम विभागाला खडबडून आली जाग..!
‘त्या’ मोरीखाली गवताने लपवलेले भगदाड बुजवले.
शिरगांव | संतोष साळसकर : कणकवली – चाफेड मार्गावरील
देवगड तालुक्यातील साळशी येथील श्री वटेश्वर मंदिरा नजिक मोरीवर भले मोठे भगदाड पडल्याने व ते गवताखाली लपवलेले असल्याने अत्यंत धोकादायक स्थितीचे वृत्त आपली सिंधु नगरी न्यूज पोर्टलवर काल २४ सप्टेंबर रोजी दुपारी प्रसिद्ध होताच संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खडबडून जाग आली. त्यांनी तातडीने साळशी येथे त्या ठिकाणाची पाहणी करण्यास सुरुवात करून त्या ठिकाणी टाकलेले दगड व उकरलेले मोठे भगदाड यावर उपाययोजना करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याच्या हालचाली शाखा अभियंता देवगड बांधकाम विभाग यांनी केल्या. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे या ठिकाणी नवीन बांधकाम करण्यास अडचण येणार असून पर्यायी मार्ग काढणे शक्य नसल्याचेही संबंधित विभागाने सांगितले. काल दुपारी या ठिकाणी संबंधित विभागाचे अभियंता तसेच कर्मचारी व दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य घेऊन साळशी गावात दाखल झाले. धोकादायक स्थितीची वस्तुस्थिती बघून त्याठिकाणी तात्पुरती डागडुजी करून मलमपट्टी करण्यात आली.
याबाबतचे छायाचित्रासह वृत्तपत्रातून व प्रसारमाध्यमात प्रसारित होताच संपूर्ण बांधकाम विभाग खळबळ उडून निद्रिस्त झालेले संबंधित विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. यापूर्वी केलेली तात्पुरती मलमपट्टी व आपले तांत्रिक अज्ञान प्रगट झाल्याने जागृत नागरिकांनी सदर बाब दर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत संबंधित विभागाचे अभियंत्यांनी याबाबत झालेले याबाबत झालेले दुर्लक्ष म्हणावे लागेल कोणतेही तांत्रिक व नैसर्गिक स्थितीचा विचार न करता केलेली उपाययोजना निष्फळ ठरली होती. हे जागरुक ग्रामस्थांनी हेरले आणि प्रसिद्धी देऊन उजेडात आणले. त्यामुळेच त्याची दखल घेणे भाग पडले अशी स्थानिकांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत जागरुक ग्रामस्थांकडून ते भगदाड हेरल्याबाबत आणि प्रसार माध्यमांच्या प्रसिद्धीमुळे संबंधितांना जाग आणल्याबाबत स्थानिक व वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)