ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजनेचा लाभ घ्यावा ; तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांचे शेतकऱ्यांना आवाहन.

प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजनेचा लाभ घ्यावा ; तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांचे शेतकऱ्यांना आवाहन.

प्रकाशन: 25 Sep 2024 08:43 PM
वाचन संख्या 225

मसुरे | प्रतिनिधी : भात पिकाचे काढणीच्या वेळेत होणारे नुकसान टाळण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना सन २०२४ – २५ अंतर्गत कृषि विभागामार्फत प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजना ७५ % अनुदान तत्वावर राबविण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत शेतक-यांचे अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २७/०९/२०२४ असुन तालुका कृषि अधिकारी यांच्या स्तरावर ते अर्ज स्विकारले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी केले आहे.

या योजनेस पात्र शेतकऱ्याकडे ०.१० हे. क्षेत्र भात पिकाखालील असावे. एका कुटुंबातील एकाच लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल. अनुसुचीत जाती व अनु. जमाती, महिला तसेच अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा परिषद (कृषी विभाग) सिंधुदुर्ग यांची जिल्हा स्तरीय खरेदी समितीने निश्चित केलेला दर रु. रु. २०००/- प्रति प्लास्टिक ताडपत्री आहे. त्यानुसार ७५ टक्के अनुदान प्रमाणे सदर प्लास्टिक ताडपत्री साठी जास्तीत जास्त रु. १५०० प्रति ताडपत्री अनुदान देय राहील. तसेच एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त १ ताडपत्री खरेदी करता येईल. सिंधुरत्न समृद्ध योजने अंतर्गत आंबा पिकासाठी प्लास्टिक क्रेटस आणि प्लास्टिक ताडपत्री योजने अंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यास सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही. सदर योजने करीता ७/१२, ८ अ, बैंक पासबुक, आधार कार्ड व रेशन कार्ड इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. तरी सदर योजने अंतर्गत जिल्ह्यातील अंदाजे ३१०० शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार असून सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता तालुका कृषी कार्यालय अथवा संबंधित क्षेत्रीय कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी २७.०९.२०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स