ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गांधी विचार परिचय परीक्षा उपक्रमाअंतर्गत मसुरे केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश...!

गांधी विचार परिचय परीक्षा उपक्रमाअंतर्गत मसुरे केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश...!

प्रकाशन: 22 Oct 2021 03:22 PM
वाचन संख्या 44

गांधी विचार परिचय परीक्षेत मोक्षदा, चैतन्य, पियुष प्रथम…

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : विद्यार्थांमध्ये नैतिक मूल्यांचा विकास आणि हिंसामुक्त समाज घडविण्यासाठी मुंबई सर्वोदय मंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘गांधी विचार परिचय परिक्षेत श्री. दाजीसाहेब प्रभूगांवकर जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा मसुरे नं. १ शाळेतील एकूण ४२ विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. ‘गांधी बापू’ आणि ‘माझी जीवनगाथा’ या पुस्तकांचे वाचन करुन त्यावर आधारीत वस्तुनिष्ठ प्रश्नांची लेखी परीक्षा असे या उपक्रमाचे स्वरुप होते.
युवा पिढीमध्ये प्रेम, बंधुत्व, मैत्रीभाव, सहिष्णुता, सेवाभाव, सत्य, अहिंसा आणि निर्भयतेचे बीज रुजवून त्यांना संघर्ष निवारणाकडे प्रवृत्त करण्यासाठी गांधीजींचे विचार पोहोचविणे असे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
या परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे-इयत्ता 5वी ते 7वी या गटातून…प्रथम क्रमांक- मोक्षदा दीपक कातवणकर व चैतन्य भगवान भोगले,
द्वितीय क्रमांक- यशश्री गुरुनाथ ताम्हणकर
तृतीय क्रमांक – यशस्वी सचिन कातवणकर
उत्तेजनार्थ – मानसी दीपक पेडणेकर
इयत्ता 8 वी ते 10 वी या गटातून
प्रथम क्रमांक- पियुष संजय भोगले, द्वितीय क्रमांक- वैष्णवी दत्ताराम सावंत , तृतीय क्रमांक – वानिष प्रशांत शिरसाट, उत्तेजनांर्थ – चेतन अनिल दुखंडे.
गुणवंत विद्यार्थांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थांना सर्वोदय मंडळ मुंबई यांच्याकडून प्रमाणपत्र देण्यात आले. यशस्वी विद्यार्थांचे मुख्याध्यापिका सौ. शर्वरी सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सन्मेष मसुरेकर आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स