ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पुढचे पालकमंत्री आमदार  वैभव नाईकच... असा विश्वास..!

पुढचे पालकमंत्री आमदार वैभव नाईकच... असा विश्वास..!

प्रकाशन: 23 Sep 2024 01:06 PM
वाचन संख्या 84

तेर्सेबांबर्डे येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात केला प्रवेश.

आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन.

कुडाळ | प्रतिनिधी :आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांचा विजय निश्चित असून ‘वैभव नाईकच पुढचे पालकमंत्री होणार”असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे गांवचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तेर्सेबांबर्डे येथील मनसे पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारा भ्रष्ट्राचार मोडून काढण्यासाठी जिल्ह्याला आमदार वैभव नाईक यांची गरज असल्याचे प्रवेश कर्त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

मनसेचे गणपत परब, अमित पुरलकर, प्रशांत पुरलकर, अमरदीप मांजरेकर, बाळा कांडरकर, बुधाजी सडेकर, संतोषी पुरलकर, अभिमन्यू परब यांनी शिवसेना पक्षाचा झेंडा हाती घेतला. या प्रवेशासाठी तेरसेबांबर्डे गांवचे शाखाप्रमुख मंगेश परब, अमित बाणे, युवासेना उपशाखाप्रमुख अक्षय मांजरेकर, अशोक बांबर्डेकर, उपशाखाप्रमुख अजित साळगांवकर तसेच इतर शिवसैनिकांनी विशेष प्रयत्न केले.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, कुडाळ शिवसेना नेते अतुल बंगे, एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, ओबीसी सेल शहर प्रमुख राजू गवंडे आदींसह श्री देऊलकर, श्री. साटेलकर यांच्यासारखे जेष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स