ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
युवा रक्तदाता संघटनेमुळे बचावला रुग्ण..!

युवा रक्तदाता संघटनेमुळे बचावला रुग्ण..!

प्रकाशन: 19 Sep 2024 08:53 PM
वाचन संख्या 142

ह्रदय शस्त्रक्रियेसाठी गोव्यातील बांबोळी रुग्णालयामध्ये जाऊन तातडीने केले रक्तदान.

मळगांव | नितीन गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील राजन गावडे या रुग्णाला, आज गोवा बांबोळी रुग्णालयामध्ये ऑपरेशन दरम्यान ‘ओ पॉझिटिव्ह’ या रक्तगटाच्या ५ फ्रेश रक्तपिशव्यांची आवश्यकता होती. याप्रसंगी युवा रक्तदाता संघटनेचे अथर्व सावंत, संदेश नेवगी, नाविद हेरेकर, वसंत सावंत, सुमीत मुळीक या दात्यांनी सावंतवाडीतून गोवा बांबोळी रुग्णालयामध्ये जाऊन रक्तदान केले.

गेली ८ वर्षे गोवा बांबोळी व कोल्हापूर येथे ह्रदय शस्त्रक्रीयेसाठी तातडीने लागणारे रक्तदाते युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्या माध्यमातून दिले जात आहे. बांदा येथील एका रुग्णाला गोवा बांबोळी येथील रुग्णालयमध्ये हृदयाच्या ऑपरेशन दरम्यान ओ- पॉझिटिव्ह या दुर्मिक रक्त गटाच्या एकाचवेळी तब्बल ५ फ्रेश रक्त पिशव्यांची अत्यंत तातडीची आवश्यकता होती. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अथर्व सावंत, संदेश नेवगी, नाविद हेरेकर, वसंत सावंत, सुमीत मुळीक यांनी सावंतवाडी येथून गोवा – बांबोळी रुग्णालयमध्ये जाऊन रक्तदान केले. यामुळे रूग्णावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करता आली. यासाठी देव्या सुर्याजी यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदात्यांनी तातडीने रक्तदान केल्यान रूग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करता आली. यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांकडून व रूग्णालय प्रशासन याजकडून रक्तदाते व युवा रक्तदाता संघटनेचे आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स