ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
तारकर्लीतील बाळगोपाळांचा सामाजिक बांधिलकीचा षटकार..!

तारकर्लीतील बाळगोपाळांचा सामाजिक बांधिलकीचा षटकार..!

प्रकाशन: 19 Sep 2024 07:53 PM
वाचन संख्या 465

गणेश भजनातून जमलेल्या निधीद्वारे सलग सहाव्या वर्षी गरजू कुटुंबाला केली मदत.

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील तारकर्ली गावातील बाळ गोपाळांनी समाजासमोर पुन्हा एकदा एक आदर्श प्रस्थापित केला आहे . तारकर्ली गावातील कु. रोहन नरेश कांदळगांवकर, कु. ईशान सदाशीव सागवेकर, कु. निनाद गणपत मोंडकर , कु. रिषभ श्रीधर खराडे , कु. हार्दिक सतिश टिकम, कु. वेदांत सदाशिव सागवेकर, कु. नैतिक धोंडी कांदळगांवकर ,‌ कु . रोहित बाळकृष्ण वरक, कु.भुवन नरेंद्र नागवेकर, कु. देवेश सीताराम पराडकर, कु. आर्यन चंद्रशेखर कुबल या बाळगोपाळांनी गणेश भजनातून जमा झालेला निधी श्री. अविनाश चंद्रकांत धुरत आणि श्री. बबन लोणे या आजारपणाने त्रस्त असलेल्या गरजू व्यक्तींना मदत म्हणुन दिला . त्यामुळे या कुटुंबाचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाला आहे.

सलग ६ वर्षे या बाळगोपाळांनी गावातील निराधार आणि गरजु व्यक्तींना आर्थिक मदत केली आहे. हे बाळगोपाळ गेली सहा वर्षे सातत्याने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित असल्याने सध्या तारकर्ली पंचक्रोशीत ते आदराचा व प्रशंसेचा विषय ठरत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 305

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स