ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
ऍड. विराज भोसले, संजय कामतेकर, उर्वी जाधव यांची  सभापती पदांवर बिनविरोध निवड...!

ऍड. विराज भोसले, संजय कामतेकर, उर्वी जाधव यांची सभापती पदांवर बिनविरोध निवड...!

प्रकाशन: 21 Oct 2021 04:27 PM
वाचन संख्या 59

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडेंनी केले अभिनंदन


कणकवली | उमेश परब : कणकवली नगरपंचायतच्या विषय समिती सभापतीपदासाठी आज बिनविरोध निवड करण्यात आली. यात बांधकाम सभापती पदासाठी ऍड. विराज भोसले, आरोग्य सभापतीपदी संजय कामतेकर, महिला बालकल्याण सभापतीपदी उर्वी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सभापती पदाची अधिकृत घोषणा प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केली. ऑनलाईन झालेल्या या विशेष सभेत पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी काम पाहिले. नूतन सभापतींचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी बांधकाम सभापती मेघा गांगण, माजी आरोग्य सभापती अभि मुसळे, माजी महिला बालकल्याण सभापती वृषाली सावंत, नगरसेवक बाबू गायकवाड, शिशिर परुळेकर, मेघा सावंत, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, अण्णा कोदे, सुशील पारकर, बंडू गांगण आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स