ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
नाट्यकलेच्या मानाची बॅ.नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर..!

नाट्यकलेच्या मानाची बॅ.नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर..!

प्रकाशन: 21 Oct 2021 03:48 PM
वाचन संख्या 39

जिल्हा नाट्यप्रेमींना खूप मोठ्या आनंदाचा दिलासा..!

कोरोनाचे सर्व नियम पाळूनच स्पर्धा सुरु होणार…!

कणकवली | उमेश परब : दरवर्षी  २४ डिसेंबर रोजी होणारी, वसंतराव प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘बॅरिस्टर नाथ पै एकांकिका स्पर्धा’, यावर्षीही संस्थेने जाहीर केली आहे .कोरोना काळातील सरकारचे नियम अमलात आणून ही स्पर्धा घेतली जाईल . गतवर्षी संस्थेने नाथ पै एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित केली होती . त्या स्पर्धेतील शालेय गटातील ४ व खुल्या गटातील ६ पारितोषिक विजेत्या एकांकिका व प्रथितयश लेखकांच्या शालेय गटातील ३ व खुल्या गटातील १७ एकांकिकांमधील एकांकिका सादर करणाऱ्या संघांना प्राधान्य देण्यात येईल . या व्यतिरिक्त अन्य एकांकिकाही सादर करता येतील .
या स्पर्धेत शालेय गटात कमाल १० एकांकिका तर खुल्या गटात कमाल १५ एकांकिकांना प्रवेश देण्यात येईल .                                        या स्पर्धेत खुल्या गटासाठी अनुक्रमे ₹ १५,००० , ₹ १०,००० व ₹ ७,००० तर शालेय गटासाठी ₹ ५००० , ₹ ३००० व ₹ २००० अशी सांघिक रोख पारितोषिके , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येते तर अभिनय स्त्री पुरुष , दिग्दर्शन , नेपथ्य यासाठीही रोख पारितोषिके , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र स्वतंत्रपणे देण्यात येतील . स्पर्धेत एकूण ६० हजार रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत .                       ” एकांकिका स्पर्धा कणकवली येथे दिनांक २५ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेतली जाईल . स्पर्धेची प्रवेश फी दोन्ही गटासाठी ₹ ५०० / – एवढी असून स्पर्धेचा प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे .अधिक माहितीसाठी संस्थेचे कार्यवाह श्री शरद सावंत यांच्या ९४२२५८४०५४ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष एडव्होकेट एन . आर . देसाई यांनी केले आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स