ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष व माजी ग्रा.पं. सदस्य संदेश भोगले यांचे आकस्मित निधन..!

काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष व माजी ग्रा.पं. सदस्य संदेश भोगले यांचे आकस्मित निधन..!

प्रकाशन: 21 Oct 2021 03:57 PM
वाचन संख्या 56

ह्रदयविकाराचा धक्का असल्याचा प्राथमीक अंदाज….!

बांदा | राकेश परब : येथील काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य संदेश भोगले यांचा मृतदेह त्यांच्या ताब्यातील कारमध्ये आढळून आला आहे. सदरची घटना आज सकाळी येथील चेक पोस्ट परिसरात उघडकीस आली. उभ्या असलेल्या कारमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत संदेश भोगले हे काल सायंकाळी कामानिमित्त घरातून बाहेर पडले होते. ते उशिरा पर्यंत घरी परतले नाही. काल रात्रीपासूनच त्यांच्या नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने त्यांची शोधा-शोध सुरु केली होती. दरम्यान आज सकाळी त्यांच्या ताब्यातील कार बांदा चेक पोस्ट परिसरात उभी असलेली आढळून आली. यावेळी कारची पाहणी केली असता आत ते मृतावस्थेत आढळून आले.दरम्यान घटनेची माहिती मिळताच बांदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. श्री संदेश भोगले यांच्या निधनाने परीसरात व राजकीय क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स