ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
सरपंच मानधनासह कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे ९१ कोटी जमा

सरपंच मानधनासह कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे ९१ कोटी जमा

प्रकाशन: 17 Aug 2024 12:20 PM
वाचन संख्या 352

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ग्रामपंचायत सरपंच , उप सरपंच यांचे मानधन आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अजिबात …

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांचे मानधन आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अजिबात प्रलंबित राहू नये याची काळजी ग्रामविकास विभागाने घेतली आहे. नेहमी ईआरपी प्रणालीने ही रक्कम अदा होत असली तरी सध्या ही प्रणाली राबवण्यात तांत्रिक अडचणी असल्याने जुलै आणि ऑगस्ट २०२४ च्या मानधन, वेतनाचे ९१ कोटी १७ लाख ८४ हजार रुपये शासनाकडून ऑफलाइन पद्धतीने अदा करण्यात आले आहेत.‘आपले सेवा केंद्र’ चालवणारी राज्यस्तरीय कार्यरत कंपनी बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामुळे मानधन आणि निधी वितरणामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. याची दखल घेत पंचायत राज विभागाच्या राज्य व्यवस्थनापन कक्षाने हा निधी जिल्हा परिषदांना वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. पंचायत राजचे संचालक सचिन घाडगे यांनी याबाबतचे सविस्तर पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवले असून, त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पातळीवर कार्यवाहीही सुरू झाली आहे.राज्यात साडे अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती कार्यरत आहेत. परंतु, काही ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच राजीनामा देत असल्याने त्या ठिकाणी नव्याने निवडी केल्या जातात. त्यामुळे ग्रामपंचातींच्या संख्येपेक्षा सरपंच, उपसरपंच यांची संख्या अधिक दिसून येत आहे.

पद – संख्या – वितरित रक्कम रूपयेराज्यातील सरपंच – २९,७४१ – १६,३१,१६,६७२

उपसरपंच – ३१,१६६ – ६८,६३,१०,६२६

ग्रा.पं. कर्मचारी – ४८,००४ – ६,२३,५७,२४६

एकूण – ९१,१७,८४,५४४

किती असते मानधन?

ग्रा. पं. वर्गवारी – सरपंच दरमहा मानधन – उपसरपंच मानधन० ते २ हजार लाेकसंख्या – ३ हजार – १ हजार रु.२००१ ते ८००० लोकसंख्या – ४ हजार – १५०० रु.८००१ पेक्षा जास्त लोकसंख्या – ५ हजार – २००० रु.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स