ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली 19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय कृतीदलाची बैठक..!

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली 19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय कृतीदलाची बैठक..!

प्रकाशन: 21 Oct 2021 11:06 AM
वाचन संख्या 36

बालकांच्या व विधवांच्या काळजी व संरक्षणाविषयक चर्चा

ओरोस | प्रतिनिधी : कोविड 19 किंवा कोरोनामुळे मुळे एक पालक गमावलेल्या तसेच दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. तसेच विधवा महिलांना त्यांच्या आर्थिक समस्यांबाबत गृहभेटी देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक घेण्यात आली. बैठकीला पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, महिला व बाल विकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी, परिवीक्षा अधिकारी बी.जी.काटकर आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी आढावा दिला. जिल्ह्यामध्ये एक पालक मयत बालके 233 असून दोन्ही पालक मयत बालके 14 आहेत. 314 विधवा असून http://localhost/news/public/uploads/200 गृहभेटी पूर्ण झाल्या आहेत. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्व 14 बालकांची खाती उघडण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, विधवा महिलांच्या बाबतीत गृहभेटीसाठी अंगणवाडी सेविकांना सूचना देण्यात याव्यात. उमेदमार्फत विधवा महिलांना योजनाचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळानेही या महिलांना योजनांचा लाभ द्यावा. ज्या बालकांचे पालक कोविड शिवाय इतक कारणांमुळे मृत झाले आहेत त्यांनाही बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याविषयी कार्यवाही करावी. तसेच त्यांना इतर योजनांचा लाभ देण्याविषयीही कार्यवाही करण्यात यावी असेही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सूचित केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स