ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली    जिल्ह्यातील बॅन्क अधिकाऱ्यांची प्रशंसा...!

जिल्हाधिकाऱ्यांनी केली जिल्ह्यातील बॅन्क अधिकाऱ्यांची प्रशंसा...!

प्रकाशन: 21 Oct 2021 10:58 AM
वाचन संख्या 46

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत जिल्हा महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकावर..!

ओरोस : प्रतिनिधी : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत आज अखेर 94 टक्के वितरण करून जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आल्याबद्दल जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी उपस्थित सर्व बँक अधिकाऱ्यांचे कौतुक केले. शासनाच्या विविध योजनांची प्रकरणे अद्यापही ज्या बँकांच्या शाखांकडे प्रलंबित आहेत, ती त्वरित मार्गी लावावीत. त्यासाठी त्यांची बैठक घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.    जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, रिजर्व बँक ऑफ इंडियाचे सुरज पोंक्षे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अजय थुटे, डीसीसी बँकेचे ए.वाय देसाई, जिल्हा उपनिबंधक एम.बी.सांगळे उपस्थित होते.
अग्रणी जिल्हा व्यवस्थापक प्रदीपकुमार प्रमाणिक यांनी सुरुवातील विषय वाचन करून माहिती दिली. 30 सप्टेंबर http://localhost/news/public/uploads/2021 पर्यंत पीक कर्जात 88 टक्के, एकूण प्राधान्य क्षेत्रासाठी 42 टक्के वितरण झाले आहे. सीडी रेशोबाबतही त्यांनी माहिती दिली.
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ज्या बँकांच्या शाखांकडे विविध योजनांची प्रकरणे प्रलंबित आहेत अशी प्रकरणे मार्गी लावावीत. बँकांनी सीडी रेशोवर लक्ष द्यावे. त्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. बँकांनी पीक कर्जाबाबत उदिष्ट पूर्तता करुन जिल्ह्याला राज्यात अग्रेसर ठेवले. यावेळी विविध महामंडळ आणि बँकांकडे प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध महामंडळाचे समन्वयक, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स