ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जायकवाडी धरण क्षेत्रात झपाट्याने पाणी वाढलं, शेतकऱ्यांची लगबग सुरू

जायकवाडी धरण क्षेत्रात झपाट्याने पाणी वाढलं, शेतकऱ्यांची लगबग सुरू

प्रकाशन: 06 Aug 2024 05:22 PM
वाचन संख्या 68

Latest Rain Update: मराठवाड्यातील शेती औद्योगिक वसाहत शहर ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवणारा जायकवाडी धरणात अहमदनगर नासिक भागातील धरणातून गोदावरी नदी मार्गाने अर्धा लाखाचेवर क्युसेकने पाणी आवक दाखल झाल्याने ‌सोमवार (ता.५) दुपारी दोन वाजेपर्यंत धरणाचा पाणीसाठा १४.८९ टक्के झाला.

नागमठाण गोदावरी नदी मार्गाने जायकवाडी जलाशयाकडे जवळपास ५१००० हजार क्युसेकने पाणी झेपावल्याने पैठण तालुक्यातील लोहगाव परिसरातील जायकवाडी धरण जलफुगवंटा क्षेत्रात झपाट्याने पाणी वाढत असल्याने धरणग्रस्त शेतकऱ्यांनी पाणी उपसा करण्यासाठीचे विद्युत पंप पाईप वायर स्टार्टर आदी साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी धावपळ लगबग सुरू आहे.

गेल्या आठवड्यात चार टक्के पाणी साठा असलेल्या जायकवाडी नाथ सागरात अहमदनगर नासिक भागातील भंडारदरा, दारणा, भावली, कडवा,भाम, वालदेवी, पालखेड, नांदूर मध्यमेश्वर बंधारा, गंगापूर, होळकर ब्रीज, आदी मोठ्या छोट्या धरणातून हजारो क्युसेक पाणी गोदावरी नदी पाञा कडे सोडल्याने गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक जलफुगवंटा भागात दाखल होत असल्याने आठवडाभरापूर्वी चार टक्के पाणी साठा हळूहळू वाढ होत असताना.

माञ गेल्या चार पाच दिवसांपासून अहमदनगर नासिक भागातील धरणे क्षेत्रात पाऊस होऊन हे प्रकल्प आनशी ते शंभर टक्के भरत आल्यामुळे हजारो क्युसेक पाणी रविवार व सोमवारी सोडण्यात आलेले पाणी गोदावरी नदी पाञ मार्गाने जायकवाडी नाथ सागराकडे झेपावल्या मुळे सोमवार दुपारी दोन वाजता पंधरा टक्के पर्यंत पाणी साठ्याची मजल गेल्यामुळे लोहगांव प

गेल्यामुळे लोहगांव परिसरातील ब्रम्हगव्हाण, मावसगव्हान,लामगव्हान जोगेश्वरी, मुलानीवाडगाव, विजयपूर, शेवता, तारूपिपंळवाडी, अमरापूर वाघुडी, ढाकेफळ, शिवारातील जल फुगवटा क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात धरण साठा जसा जसा खालावत गेला तस तसे आपले शेतीपंप पाणी उपसा करण्यासाठी मागे मागे हलवली होती.

त्या ठिकाणी पाणी पसारा वाढत असल्याने दोन दिवसांपासून शेतीपंप पाईप, वायर स्टार्टर आदी साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.परतू धरण जलफुगवंटा भागात अधुन मधुन रिमझिम पाऊस पडत असुन खरीप पिकासाठी जोरदार पाऊसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स