ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
भीमा खळाळली पण उजनी धरणाचे कालवे कोरडेच! सोलापूरकरांना पाण्याची प्रतीक्षा
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भीमा खळाळली पण उजनी धरणाचे कालवे कोरडेच! सोलापूरकरांना पाण्याची प्रतीक्षा

प्रकाशन: 06 Aug 2024 05:45 PM
वाचन संख्या 42

उजनी आणि वीर धरणातून जवळपास दीड लाख क्युसेक विसर्गाने चंद्रभागेत पाणी येत असताना शेतकऱ्यांना गरज असताना उजनीचे कालवे मात्र कोरडे पडले आहेत.

Ujni Dam: राज्यात धुंवाधार झालेल्या पावसामुळे आणि मायनसमध्ये गेलेलं उजनी धरण (Ujni Dam) ओफरफ्लो झालं. उजनी आणि वीर धरणातून जवळपास दीड लाख क्युसेक विसर्गाने चंद्रभागेत पाणी येत असताना शेतकऱ्यांना गरज असताना उजनीचे कालवे मात्र कोरडे पडले आहेत. सोलापूर (Solapur) जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या नीरा नरसिहपूर येथे भीमा आणि नीरा नदीचा संगम होऊन हे सर्व पाणी पंढरपूरकडे येते. सध्या याच वीर धरणातून सोडलेल्या पाण्याने भीमा दुथडी भरून वाहत असली तरी कालवे कोरडेच असल्याने सोलापूरकरांना कालव्यातील पाण्याची प्रतीक्षा आहे. आता यात उजनी धरणाचे पाणी येण्यास सुरुवात झाल्यास पंढरपूरचा पुराचा धोका वाढणार आहे.

कालव्यात पाणी सोडून पाझर तलाव भरण्याची मागणी

धरणातून विसर्ग होत असला तरी कालव्यात पाणी मात्र सोडले जात नसल्याने शेतकरी नाराज बनलेला आहे तातडीने शासनाने उजनीच्या कालव्यात पाणी सोडून सर्व पाझर तलाव भरून घ्यावेत, अशी मागणी युवासेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी केली आहे. शासनाला आवाहन करताना इंगळे यांनी कोरड्या कॅनॉल मधून उभे राहून परिस्थिती दाखवली आहे .

पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याचे आश्वासन

याबाबत उजनी प्रशासनाशी संवाद साधला असता उजनी मुख्य कालव्याच्या काही भागात अस्तरीकरणाचे काम सुरू होते त्यामुळे कालव्यात पाणी सोडता आले नसल्याचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितले .काल हे अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आज सकाळी 6 वाजेपासून 500 क्युसेक विसर्गाने मुख्य कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. उद्या सकाळपासून पूर्ण क्षमतेने म्हणजे 3000 क्युसेक विसर्गाने पाणी सोडले जाईल असे आश्वासन देण्यात आलं आहे. उजनी सध्या 108% भरली असून आता उजनीतून सीना माढा , दहिगाव उपसा सिंचन योजना व बोगदा मधूनही पाणी सोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

उजनी धरण 91 टक्के भरले

उजनी धरणाचे 16 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले असून उजनी धरणातून भीमा पात्रात 21 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. मात्र, रात्री 8 नंतर 40 हजार क्युसेकने हा विसर्ग करण्यात येत आहे. उजनी धरण 89 टक्क्यापेक्षा अधिक भरलं असून भीमा काठाच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरण सध्या 91 टक्के इतकं भरलं असल्याने उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये सायंकाळी 5 पाच वाजल्यापासून 21 हजार 600 क्युसेक इतका विसर्ग सुरु करण्यात आला होता. दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणाच्या भीमा नदी पात्रात 95 हजार http://localhost/news/public/uploads/200 क्युसेक इतका विसर्ग येत असल्याने उजनी धरण व्यवस्थापनाने हा निर्णय घेतलाय. उजनी धरणाचे 16 दरवाजे हे 40 सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. उजनी धरण हे एकूण 117 टीएमसी क्षमतेचा असून सध्या उजनी धरणात 111 पूर्णांक 77 टीम्स इतका पाणीसाठा झाला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स