ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
श्रावण मासानिमित्त अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

श्रावण मासानिमित्त अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

प्रकाशन: 04 Aug 2024 11:04 AM
वाचन संख्या 183

मसुरे प्रतिनिधी |

श्रावणमासा निमित्त अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.

श्रावणमासा निमित्त सोमवार दिनांक ५ ऑगस्ट २०२४ ते रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ अखेर अंबड, जिल्हा-जालना येथील ह.भ.प.श्रीहरी महाराज रसाळ यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या सप्ताहात सोमवार दिनांक १२ ऑगस्ट ते रविवार दिनांक १८ ऑगस्ट अखेर बोरगाव येथील ह.भ.प. भागवताचार्य महादेव महाराज पाटील-काळे यांच्या वाणीतून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक २० ऑगस्ट ते मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट अखेर ह.भ.प. योगीराज महाराज प्रकाश गोंदीकर (श्री क्षेत्र गोंदी) जि.जालना यांचे गोकुळ अष्टमी व गोपाळकाल्या निमित्त कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तन सेवेत लातूर जिल्ह्यातील चिकुर्डा येथील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाची साथ संगत लाभणार आहे. बुधवार दिनांक २८ ऑगस्ट ते मंगळवार दिनांक ३ सप्टेंबर अखेर चौथ्या सप्ताहात आळंदी देवाची येथील भागवताचार्य ह.भ.प.विजय महाराज पांचाळ यांची भागवत कथासार सेवा आयोजित करण्यात आली आहे.

सदर वरील सर्व कार्यक्रम श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत संपन्न होतील, तरी श्रावण मासानिमित्त वरील प्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या आध्यात्मिक कथा कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात नित्यनियमाने होणारी सकाळी ११:३० वाजताची श्री.स्वामी समर्थांची नैवेद्य आरती श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी सकाळी ११:३० वाजता न होता सायंकाळी ५:३० वाजता नैवेद्य आरती होईल व त्यानंतर उपस्थित भाविकांना देवस्थान कडून प्रसाद वाटप करण्यात येईल. यानंतर श्रावण सोमवारी रात्रीची शेजारती होणार नाही याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स