महावितरण आणि तत्पर लोकप्रतिनिधींमुळे विद्युतपुरवठ्यातील समस्या दूर !
मालवण प्रतिनिधी |
मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ ते झांटये काजू फॅक्टरी, फोवकांडा पिंपळ ते बोर्डीग ग्राऊंड, परुळेकर गल्ली, माडये गल्ली, सेवांगण रोड, भरड नाका ते फाटक शाळा, पांजरी गल्ली, भरड नाका ते खांडाळेकर घर, नंदू वझे ते आरोलकर घर या परिसरातील विजेच्या खांबांवर झाडांच्या फांद्या आलेल्या असून वादळी वाऱ्यांमुळे त्या वरील मार्गावरील वाहिन्यांवर येऊन वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत होता.या प्रश्नांवर माजी नगरसेवक आणि बांधकाम सभापती श्री यतीन खोत, माजी नगरसेवक आणि बांधकाम सभापती श्री मंदार केणी आणि सौ. शिल्पा यतीन खोत यांनी महावितरण अधिकारी यांच्याकडे 22 जुलै रोजी निवेदन दिले होते. यावेळी त्यांच्यासोबत श्री गिरकरदीपा शिंदे ,नांदा सारंग ,अश्विनी आचरेकर ,मानसी घाडीगावकर, साक्षी मयेकर ,अंकिता पवार शेडगे व इतर सहकारी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनानुसार एम एस सी बी च्या कर्मचाऱ्यांनी फांद्या कटाईसाठी सुरुवात केली आहे. या पाठपुराव्याबद्दल श्री यतीन खोत , केणी आणि सौ. शिल्पा यतीन खोत यांनी महावितरण अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)