ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मडुरा न्यू इंग्लिश स्कूलचे ३१ डिसेंबर रोजी 'नवा विद्यार्थी' कुमार साहित्य संमेलन.

मडुरा न्यू इंग्लिश स्कूलचे ३१ डिसेंबर रोजी 'नवा विद्यार्थी' कुमार साहित्य संमेलन.

प्रकाशन: 29 Dec 2022 05:29 PM
वाचन संख्या 102

बांदा | राकेश परब :
दि नवभारत भारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई आयोजित १४ वे ‘नवा विद्यार्थी’ कुमार साहित्य संमेलनाचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल मडुरा येथे ३१ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.

साहित्य संमेलनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून माजी खासदार डॉ. निलेश राणे, तसेच गोवा विश्वविद्यालय कोंकणी भाषा विभाग प्रमुख तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. हनुमंत चोपडेकर, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माध्य. शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख, महिला व बालकल्याण माजी सभापती शर्वाणी गावकर, जि.प. माजी सदस्य श्वेता कोरगावकर, सावंतवाडी पं. स.माजी सभापती निकिता सावंत, पं. स. माजी सदस्य श्रुतिका बागकर, मडुरा सरपंच साक्षी तोरसकर, भारतीय सैन्य दलाचे कॅप्टन शंकर भाईप, मडुरा पंचक्रोशी विकास समिती मुंबई अध्यक्ष भिकाजी वालावलकर, सचिव तुकाराम शेटकर आदी उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ८.३० ते १० वाजता मडुरा तीठा ते इंग्लिश स्कूल मडुरा पर्यंत ग्रंथ दिंडी शोभायात्रा, सकाळी १० ते १२ उद्घाटन सोहळा, दुपारी १२ ते १.०० वा. कथाकथन होणार असून ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.३० ते ४.०० वाजेपर्यंत कवी संमेलन होणार असून ज्येष्ठ कवयित्री चारुता प्रभुदेसाई मार्गदर्शन करतील. सायंकाळी ४ ते ५ वाजता समारोप समारंभ होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प्रभारी मुख्याध्यापक सुहास वराडकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स