आगामी काळात स्वबळावर लढण्याचा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला मानस.
आगामी काळात स्वबळावर लढण्याचा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला मानस.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुका भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आगामी काळातील निवडणुका कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर स्वबळाबर लढविणार असल्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांच्या मालवणातील पत्रकारांशी संवादा दरम्यान त्यांनी तसे स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा पंधरवडा' साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर हाॅटेल महाराजा येथे नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीनुसार, तालुक्यात एकूण १२ पंचायत समिती गणांमध्ये सभा घेतल्या जाणार आहेत. यात १४ सप्टेंबर रोजी पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातील दोन पंचायत समिती गणांमधून या सभेची सुरुवात होईल. २० सप्टेंबर रोजी मालवण शहरात या सेवा पंधरवड्याची सांगता होणार आहे. या सेवा पंधरवड्यात भाजप कार्यकर्ते वृक्षारोपण आणि दिव्यांग बांधवांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. तसेच, केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाईल असे श्री. चिंदरकर यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार सेवा पंधरवड्या दरम्यान भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. घटस्थापनेच्या दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे मालवणचा दौरा करतील. या दौऱ्यात ते जनता दरबार घेऊन नागरिक आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधतील. तसेच विकासात्मक कामांचा आढावा घेण्यासोबतच तालुक्यात नवीन उद्योग आणण्यासाठीच्या शक्यतांवरही चर्चा करतील, असे चिंदरकर यांनी सांगितले.
यावेळी शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, माजी नगरसेवक पंकज सादये, माजी नगरसेवक मंदार केणी, भाई कासवकर, जीवन भोगावकर, महेंद्र चव्हाण, मनोज मेथर, सचिन आंबेरकर, पंकज पेडणेकर, रवींद्र टेंबुलकर, प्रमोद करलकर, रोहन पेंडूरकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, अन्वेषा आचरेकर, महिमा मयेकर, सेजल परब, वैष्णवी मोंडकर, दीक्षा गावकर, अमिता निवेकर, समीक्षा खोबरेकर, रश्मी लुडबे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे.
सौजन्य | मालवण ब्यूरो
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)