ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
त्या धडाकेबाज व दक्ष पोलिसांचे केले जिल्हा पोलिस अधिक्षकांनी कौतुक..!

त्या धडाकेबाज व दक्ष पोलिसांचे केले जिल्हा पोलिस अधिक्षकांनी कौतुक..!

प्रकाशन: 20 Oct 2021 08:53 PM
वाचन संख्या 45

केवळ २४ तासांत २३ लाखांच्या लुटीच्या बनाव केला होता उघड…!


ब्युरो न्यूज : विवेक परब : २३ लाखांच्या लुटीचा बनाव करणाऱ्यांचा वैभववाडी पोलिसांनी २४ तासांत पर्दाफाश केला. वैभववाडी पोलीसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक करत पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडेंनी पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे.
सेक्युअर व्हॅल्यु इंडिया कंपनी लि. ही कंपनी जिल्ह्यातील बॕंकांच्या एटीएम मध्ये पैसे भरण्याचे काम सन २०१५ पासून जिल्ह्यात करीत आहे. या कंपनीचे कर्मचारी विठ्ठल खरात रा. वेंगुर्ला व सगुण केरवडेकर रा. कुडाळ ये दोघजण गेली पाच सहा वर्षे कंपनीत काम करीत आहेत. मंगळवारी कणकवली येथील बॕंक आॕफ इंडीया शाखेतून एटीएम मशिनमध्ये भरण्यासाठी त्यांनी ३० लाख रुपये काढले. त्यातील ७ लाख रुपये येथीलच एटीएम मशिनमध्ये भरले व उर्वरित २३ लाख रुपये घेऊन मोटारसायकलने ते वैभववाडी येथील एटीएम मशिनमध्ये भरण्यासाठी येत होते. दरम्यान तळेरे वैभववाडी महामार्गावर कोकिसरे घंगाळवाडीनजीक मागून मोटारसायकलवरुन आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मोटारसायकलला लाथ मारली. यात हे दोन्हीही कर्मचारी रस्त्याच्या कडेला पडले. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावाडर टाकून त्यांकडे असलेली २३ लाख रुपये असलेली बॕग हिसकावून घेऊन तळेरेच्या दिशेने पोबारा केला, अशी फिर्याद या कर्मचाऱ्यांनी वैभववाडी पोलिस ठाणेत दिली होती.
पोलीस निरीक्षक अतुल जाधव व पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पो.उ.नि सुरज पाटील, पोलीस नाईक अभिजित तावडे यांनी यांनी विठ्ठल जानू खरात, रा. वायंगणी याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने आपण व फिर्यादी सगुण मनोहर केरवडेकर यांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे मान्य केले व गुन्हा उघडकीस आणला. ही लुटीची रक्कम रु. २३ लाख त्यांचा मित्र लाडू उर्फ निखिल वेंगुर्लेकर वय ३० रा. कोचरे वेंगुर्ला सध्या राहणार एमआयडीसी कुडाळ याच्या ताब्यात दिल्याचे व त्यानंतर त्याने ही रक्कम किरण प्रभाकर गावडे वय ३२ रा. नेरूर, वाघाचीवाडी, कुडाळ याच्या ताब्यात दिल्याचे मान्य केले. त्यानंतर ही रक्कम व गुन्ह्यात वापरलेली वाहने देखील पोलिसांनी जप्त केली आणि या गुन्ह्यातील सर्व गुन्हेगारांना जेरबंद केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स