ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
तारकर्ली पर्यटन संस्थेच्या अध्यक्षपदी श्री सहदेव साळगांवकर यांची बिनविरोध निवड...!

तारकर्ली पर्यटन संस्थेच्या अध्यक्षपदी श्री सहदेव साळगांवकर यांची बिनविरोध निवड...!

प्रकाशन: 20 Oct 2021 08:40 PM
वाचन संख्या 53

संस्थेचे मावळते अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिल्या शुभेच्छा..

मालवण | वैभव माणगांवकर : मालवण तालुक्यातील तारकर्ली पर्यटन संस्थेच्या झालेल्या पर्यटन व्यावसायिकांच्या सभेत विद्यमान अध्यक्ष श्री बाबा मोंडकर यांचा कार्यकाळ संपल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पर्यटन व्यावसायिकांनी  संस्था अध्यक्ष म्हणून एकमताने श्री सहदेव साळगांवकर यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष म्हणून श्री मिलिंद झाड ,सचिव श्री दादा वेंगुर्लेकर,खजिनदार श्री दर्शन वेंगुर्लेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष व सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष श्री बाबा मोंडकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री सहदेव साळगांवकर व नवीन कार्यकारणीचा सत्कार केल यावेळी बोलताना ते म्हणाले की तारकर्ली पर्यटन संस्थेच्या माध्यमातून किनारपट्टीवरील जलक्रीडा व होम स्टे तथा न्याहरी निवास यांना प्रशासन स्तरावर आवश्यक परवानग्या मिळण्यासाठी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन क्षेत्रात नांव जगभर पोचविण्यामागे संस्थेचे खूप मोठे योगदान असून येणाऱ्या काळात नवीन संचालक मंडळाने ही जबादारी स्वीकारून पर्यटन व्यावसायिक व प्रशासन यांचा समन्वय साधून संस्थेचे कामकाज चालवतील.              यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री सहदेव साळगावकर यांनी संस्थेच्या माध्यमातून सर्व पर्यटन व्यावसायिकांना सोबत घेऊन स्थानिक भागातील पर्यटन व्यावसायिकांना सोबत घेऊन व्यावसायिकांच्या प्रलंबीत प्रश्नांवर संस्था काम करेल. यावेळी श्री देवानंद लोकेगांवकर मालवण पर्यटन महासंघ  तालुका अध्यक्ष श्री अवि सामंत ,श्री रवींद्र खानविलकर, श्री रामा चोपडेकर ,श्री चंद्रशेखर परब ,श्री सीमाव फर्नांडिस,श्रीमती दिप्ती तारी व अन्य पर्यटन व्यावसायिक मोठया संख्येने उपस्थित होते .            तारकर्ली पर्यटन संस्थेचे नूतन अध्यक्ष श्री सहदेव साळगांवकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स