ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सूचनेवरून जिल्ह्याला जास्त प्रमाणात लस पुरवठा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सूचनेवरून जिल्ह्याला जास्त प्रमाणात लस पुरवठा

प्रकाशन: 05 Aug 2021 06:18 PM
वाचन संख्या 38

जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी वेधले लक्ष.                           कणकवली | उमेश परब :सिंधुदुर्ग जिल्ह्याला नजीकच्या सोलापूर ,कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या तुलनेत  कमी प्रमाणात लस उपलब्ध  होत होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसंख्या विचार करता इतर जिल्ह्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यासाठी फार कमी प्रमाणात लस उपलब्ध होत होती. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यासाठी  लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक असल्याबाबत अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग श्रीम. संजना सावंत यांनी  केंद्रीय सूक्ष्म, लघु उद्योग व मध्यम प्रकल्प मंत्री खा.नारायण राणे साहेब यांचे लक्ष वेधले होते. राणे साहेबांनी दिल्ली येथे व्यस्त कामकाजात असताना देखील  तात्काळ दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात  लस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्याने सिंधुदुर्गसाठी ०४ ऑगस्ट रोजी कोविड शील्ड व कोव्हॅक्सिन मिळून १७ हजार लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी साहेबांचे असलेले पालकत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर लसिंचे डोस पुरवठ्याबाबत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत होणारा अन्याय जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे यापूर्वीच पत्राद्वारे मांडला होता परंतु त्यांच्याकडून त्यावर कोणत्याही प्रकारची दखल देखील घेण्यात आली नाही. आज पासून मोठ्या प्रमाणात लस पुरवठा होत असल्याने लवकरात लवकर शंभर टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण होणार असल्याने जिल्ह्यातील जनतेच्या वतीने खा. नारायण राणे साहेब व जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांचे जाहीर आभार युवा मोर्चा अध्यक्ष रूपेश कानडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स