महाड पूरग्रस्तांना संसारोपयोगी साहित्य वाटप!
मसुरे | झुंजार पेडणेकर
बोरिवली मुंबई येथील वृत्तपत्र वितरक निलेश नाईक व सहकाऱ्यांनी महाड तालुक्यातील गवळवाडी गोंडाळे ग्रामपंचायत येथील पूरग्रस्तांना संसारोपयोगी साहित्याच्या शंभर पॅकेटची मदत नुकतीच केली.मदत कार्यात नीलेश याना नरेश सुर्वे, राजा काळे, दिशांत चुरी यांनी सहकार्य केले. पूरग्रस्तांना एक मदतीचा हात देण्याचा छोटासा प्रयत्न सर्व सहकाऱ्यांच्या साथीने केल्याचे निलेश नाईक म्हणाले. बोरिवली येथील विविध सोसायटी मधील दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहकार्य करतानाच काही सोसायटींकडून ५ किलो गव्हाच पीठ, बिस्कीट चहा पावडर तसेच साड्या,लहानमुलाचे न वापरलेले कपडे असे बरेचे सामान दिल्याची माहिती निलेश नाईक यांनी दिली. तसेच सर्व दात्यांचे मदती बद्दल आभार मानले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.