ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री. स्वामी समर्थ मठ, हडपीड येथे गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन.

श्री. स्वामी समर्थ मठ, हडपीड येथे गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन.

प्रकाशन: 15 Jul 2024 02:08 AM
वाचन संख्या 87

मसुरे | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी – मुंबई संचलित देवगड तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ हडपिड येथे २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ ते १० : गणेश पूजन, पादुका पूजन, पुण्यवाचन होमहवन, सकाळी १०:३० ते १२:०० नामस्मरण व तीन दिवसीय नामस्मरण कार्यक्रमाची सांगता, दुपारी १२.०० ते १:०० महाआरती, दुपारी १:०० ते ३:०० महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ५:००
१०वी – १२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवराच्या हस्ते सन्मान तसेच सायंकाळी ५:०० ते ८:०० भक्तीमय कार्यक्रम होणार आहेत.

१९ ते २१ जुलै रोजी मठात होणाऱ्या नामस्मरण कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. तसेच १९ ते २१ जुलै कालावधीत
देवगड तालुक्यातील प्राथमिक शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रभाकर राणे, अक्कलकोट भूषण, ट्रस्टचे संस्थापक सचिव श्री. नंदकुमार पेडणेकर, खजिनदार श्री. ज्ञानेश्वर राऊत, सर्व विश्वस्थ, कार्यकारी मंडळ व गांव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स