ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वागदे ग्रामस्थांना मोबदला मिळण्यासाठी वर्षभर पाठपुरावा केला जातोय....!

वागदे ग्रामस्थांना मोबदला मिळण्यासाठी वर्षभर पाठपुरावा केला जातोय....!

प्रकाशन: 20 Oct 2021 04:25 PM
वाचन संख्या 54

माननीय प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची माहिती….

कणकवली | उमेश परब : वागदे येथील ग्रामस्थांना हायवेचा मोबदला न मिळाल्याप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांसोबत आज पार पडलेल्या चर्चेमध्ये प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी वागदे येथील ग्रामस्थांना मोबदला मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे सांगितले.
कणकवली ६६ जणांचा निवाडा वर्षभरापूर्वी पाठविलेला आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा व स्मरणपत्रे दिलीत. आपल्याकडे केवळ सहा ते सात जणांचाच निवाडा पाठविणे बाकी असून तो आपण तातडीने पाठविणार आहे. मात्र, निवाडा फास्ट करणे ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची जबाबदारी असून ती टाळता येणार नाही. त्यासाठी आमच्यासोबत प्राधिकरणचाही पाठपुरावा हवा. यासाठी कार्यकारी अभियंत्याना बोलावून दोन दिवसांत बैठक लावण्यात येईल. तसेच डायव्हरशनच्या ठिकाणी रस्ता सुरक्षिततेची जबाबदारी हायवे प्राधिकरण व ठेकेदाराची असून ती तातडीने करून अपघात होणार नाहीत याची काळजी घ्या, अशा सक्त सूचना प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स