ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
तरुण चैतन्याचे भजनी    गायक श्री. संतोष मसुरकर यांचा मसुरे गावात झाला सत्कार..

तरुण चैतन्याचे भजनी गायक श्री. संतोष मसुरकर यांचा मसुरे गावात झाला सत्कार..

प्रकाशन: 20 Oct 2021 04:56 PM
वाचन संख्या 36

अल्पावधीतच भजनप्रेमींची मने जिंकलेले भजनीबुवा…..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुक्यातील मसुरे टोकळवाडी गावचे सुपुत्र, प्रसिद्ध भजनी बुवा तरुण चैतन्याचे भजनी गायक श्री. संतोष मसुरकर यांचा मसुरे गावात झाला सत्कार.. प्रसिध्द नाट्य कलाकार संतोष मसुरकर यांनी अल्पावधीतच भजन, नाट्य,सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून मसूरे साई मंदिर येथे सत्कार करण्यात आला. प्रदीप पाटकर आणि मेघःश्याम पेडणेकर यांच्या शुभहस्ते साईनाथ भक्त मंडळ मसुरे यांच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला. आपल्या अल्पावधीत संगीत भजन, कला क्रीडा, नाट्य क्षेत्रात केलेल्या चेतनादायी कामगिरीबद्दल या वेळी सर्वांनी विशेष कौतुक केले. मालवण तालुक्यातील भजन क्षेत्रामध्ये व इतरही ठिकाणी आपल्या मधुर गायकीने संतोष यांनी भजन रसिकांच्या मनांवर अधिराज्य गाजविले आहे. यावेळी मेघश्याम पेडणेकर, प्रदीप पाटकर, बाळू दळवी, दिपक पेडणेकर, शैलेश मसुरकर, दीपक शिंदे, दिनकर दुखंडे, यशवंत परब, समीर सावंत, सुनील प्रभुगांवकर, सुनील दूखंडे, रोशन दुखंडे, झुंजार पेडणेकर, बाबू मुळीक, नीळकंठ शिरसाट, महेश दुखंडे, बबन परब, बबन मसुरकर, वानिष शिरसाट, मनीष घाडीगांवकर, भालचंद्र खोत, अनील दुखंडे आणि सर्व क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स