ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांना आ. वैभव नाईक यांच्या इशार्यानंतर आली जाग ; नवीन आंबेरी पुलावरून एसटी वाहतूक केली सुरु.

सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांना आ. वैभव नाईक यांच्या इशार्यानंतर आली जाग ; नवीन आंबेरी पुलावरून एसटी वाहतूक केली सुरु.

प्रकाशन: 09 Jul 2024 03:57 PM
वाचन संख्या 131

माजी जि. प. सदस्यांनी मानले राजू कविटकर यांनी मानले आमदार वैभव नाईक यांचे आभार.

कुडाळ : अतिवृष्टीमुळे आंबेरी येथील जुन्या पुलाला मोठे भगदाड पडल्याने खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला होता. एस टी वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. मात्र याच ठिकाणी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांमुळे उभारण्यात आलेल्या नवीन पुलावरून अद्याप पर्यंत वाहतूक सुरु न झाल्याने पाहणी करण्यासाठी आलेले आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत दोन दिवसात पुलावरून वाहतूक सुरु न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता. आमदार वैभव नाईक यांच्या दणक्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंबेरी येथील नवीन पुलावरून वाहतूक सुरु करण्याचे पत्र एसटी महामंडळाला दिले आहे. आज प्रत्यक्षात या पुलावरून एसटी वाहतूक सुरु झाली. त्याबद्दल माजी जि. प. सदस्य राजू कविटकर यांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले तसेच पुलाच्या ऍप्रोच रोडचे काम चांगल्या पद्धतीने करण्याच्या सूचना सा. बा. विभागाच्या अधिकाऱ्यांना राजू कविटकर यांनी दिल्या आहेत.

आमदार वैभव नाईक यांनी आंबेरी पुलासाठी बजेट अंतर्गत ६ कोटी २५ लाख रु मंजूर करून पुलाचे काम पूर्ण करून घेतले. मात्र त्यानंतर दोन वर्षात सत्तांतर होऊन सत्तेत आलेल्या भाजपने पुलाच्या ऍप्रोच रोडसाठी आवश्यक असलेला ५० लाखाचा निधी दिला नाही. वारंवार पाठपुरावा करून देखील याकडे पालकमंत्री आणि सा. बा.विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली. त्यामुळे याचा फटका खोऱ्यातील लोकांना बसला. येणाऱ्या २ दिवसात ऍप्रोच रोडचे काम पूर्ण करून नवीन पुलावरून वाहतूक सुरु न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा आ. वैभव नाईक यांनी सोमवारी दिला होता. त्यामुळे आता आंबेरी पुलावरून वाहतुकीचा प्रश्न सुटून खोऱ्यातील नागरिकांची पावसाळ्यात होणारी वाहतुकीची गैरसोय दूर झाली आहे.

यावेळी माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, एसटी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक, विभाग संघटक कौशल्य जोशी, उपसरपंच बापू बागवे वसोली सरपंच अजीत परब, उपविभाग प्रमुख एकनाथ धुरी, ग्रामपंचायत सदस्य अवधुत गायचोर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स