ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वेरली शाळेची कु. उर्वी खराबी ग्रामीण शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत.

वेरली शाळेची कु. उर्वी खराबी ग्रामीण शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत.

प्रकाशन: 09 Jul 2024 03:22 PM
वाचन संख्या 123

मसुरे | प्रतिनिधी : शासनाच्या वतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत जि .प. पू. प्रा . शाळा वेरलीची कु . उर्वी उमेश खराबी हिने मालवण तालुक्यातून ग्रामीण प्रभागातून तिसरा क्रमांक प्राप्त करत जिल्ह्याच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. त्याबद्दल वेरळ पंचक्रोशीत उर्वी खराबी व वेरली प्रशालेचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.वेरळ सरपंच श्री. धनंजय परब, उपसरपंच श्री. दिनेश परब, केंद्रप्रमुख श्री. नंदकिशोर गोसावी, प्रशालेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण पोयरेकर, उपाध्यक्ष सौ सिल्व्हिया लोबो व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, प्रशालेच्या माजी उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सौ. शुभदा रेडकर, श्री. गणेश रेडकर आदी मान्यवरांनी शाळेला भेट देऊन कु. उर्वी खराबी हिचे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र धारपवार, मार्गदर्शक शिक्षक श्री. उमेश खराबी, सौ. विमल खराबी व श्री.अविनाश उबाळे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मालवण तालुका गटशिक्षणाधिकारी श्री . संजय माने , वेरळ ग्रा . पं. सदस्य, शाळेचे माजी शिक्षक, पालक, वेरळ ग्रामस्थ आणि शाळेचे माजी विद्यार्थी यांनीही कु. उर्वीचे अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 277

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स